नोव्हेंबर 23 मध्ये सदर बस पुरविणाऱ्या कंपनीसी करार करण्यात आला असून मधल्या काळात करारा प्रमाणे 4000 बस येणे अपेक्षित होते. पण आता पर्यंत फक्त 220 बस पुरविण्यात आल्या आहेत. या बससाठी एसटीने 80 चार्जिंग स्टेशन तयार केले असून त्यावर अंदाजे 100 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. हे पैसे सरकारने एसटीला दिले असून सदर 100 कोटी रुपये बुडाल्यात जमा असल्याचा आरोपही बरगे यांनी केला आहे. मुंबई : एसटी महामंडळानं 5150 विजेवरील बस कंत्राटी पद्धतीने घेण्याचा करार इव्हे ट्रान्स कंपनीशी केला असून सदर कंपनी दर महिन्याला 215 बसेस देणार होती. पण वेळेत बसेस पुरविण्यात आल्या नाहीत. ठरलेल्या मुदतीत बसेस न पुरविणाऱ्या कंत्राटदार कंपनीवर कारवाई करण्याचे पत्र एसटीचे तत्कालीन अध्यक्ष , परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी यांनी दिले होते. पण मुदत संपूनही कारवाई करण्यात आली नाही. एसटीचे व्यवस्थापन कुणाच्या दबावाखाली काम करत आहे ? असा सवाल महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी एसटीच्या व्यवस्थापनाला विचारला आहे. विजेवरील बसच्या प्रकल्पाचे उद्घाटन राज्याच...
NSS प्रीआरडी शिबीर सहभागी स्वयंसेवक श्री आनंद मारुती लोखंडे MSC MED MMCJ हे साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त ,मंथली विजयप्रताप शासन संवाद द डिजिटल प्रेस द डिजिटल मिडिया समाज पुढारी इत्पायादीचे संपादक मालक मुद्रक प्रकाशक हे आहेत त्यांनी एसटी पत्रिका सुरु केली आहे कामगार आणि कामगार संघटना यांनी आनंद प्रिंटर्स आणि पब्लिशर्स द्वारा सिद्धेश्वर नगर भाग ५ प्लॉट २०६ मजरेवाडी पोस्त टीकेकावाडी दक्षिण सोलापूर येथून प्रकाशित बातम्या - ९९६०२०७४५३ या whatsapp क्रमांकावर पाठवा .